वेंगुर्ला तालुका भाजपाची ६१ जणांची कार्यकारीणी जाहिर......स्थानिक स्वराज संस्थेवर भाजपचाच झेंडा असा कार्यकारणीत निर्धार

वेंगुर्ला तालुका भाजपाची ६१ जणांची कार्यकारीणी जाहिर......स्थानिक स्वराज संस्थेवर भाजपचाच झेंडा असा कार्यकारणीत निर्धार

 

 

वेंगुर्ला

 

         भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या आदेशानुसार वेंगुर्ला तालुक्यातील मंडल कार्यकारणीची ६१ जणांची मोठी कार्यकारणी जाहिर करण्यात आली.या कार्यकारणीत नविन तसेच युवा चेहर्‍यांना संधी देण्यात आली.आगामी जिल्हा परीषद पंचायत समिती व नगरपालिका या निवडणुकीत शत- प्रतिशत भाजपाचा म्हणुन सज्ज व या सर्व स्थानिक स्वराज संस्थेवर भाजपचा झेंडा असेल असा निर्धार करण्यात आला. यावेळी दर महिन्याच्या १२ तारीखला मिटिंग असेल असे ठरविण्यात आले. सदर बैठकीस प्रमुख  उपस्थिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पप्पू परब यांच्या हस्ते नवीन मंडळ कार्यकारणी जाहीर करण्यात आली तसेच नवनियुक्त मंडळ पदाधिकारी व शक्ती केंद्र प्रमुख यांना गुलाब पुष्प व नियुक्ती पत्रक  देण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू चंद्रकांत परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सुषमा प्रभुखानोलकर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण, माजी मंडळ अध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रीत सदस्य साईप्रसाद नाईक, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा  कार्यकारणी सदस्य निलेश सामंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष दिपक गवस तसेच जिल्हा, मंडळ पदाधिकारी महिला मोर्चा पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी, विविध आघाडी मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.