ओरोस येथे मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
ओरोस
ओरोस येथील पिटढवळ नदीजवळ मुंबई-गोवा महामार्गावर एका वाहनाचा अपघात झाला. केरळवरून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एका टाटा ट्रॅक वाहनाला हा अपघात घडला असून, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, KL 14 AF 5193 क्रमांकाचे हे वाहन केरळवरून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ओरोस येथील पिटढवळ नदीच्या पुलाजवळ आले असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हे वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगवर जाऊन जोरात धडकले. सुदैवाने हे वाहन लोखंडी रेलिंगमध्ये अडकल्याने पुलाच्या खाली कोसळले नाही, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र त्यातील वाहक पूर्णपणे सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे. ओरोस पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले आणि अपघाताचे नेमके कारण काय, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
konkansamwad 
