७००० कोटींचा टप्पा पार — सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार आर्थिक झेप
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत एकूण व्यवसायाचा तब्बल ₹ ७००० कोटींचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे. 31 मार्च 2026 अखेर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बँकेच्या ठेवी, कर्जवाटप आणि एकूण निधीत लक्षणीय वाढ झाली असून अनेक घटकांमध्ये दुहेरी अंकात वाढ नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे, निव्वळ नफा ₹ ५० कोटींवर पोहोचला असून, ही वाढ बँकेच्या आर्थिक सुदृढतेची साक्ष देणारी ठरली आहे.याबाबत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सर्व ठेवीदार, कर्जदार, ग्राहक आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले. “ग्राहकांनी बँकेवर दाखवलेला विश्वास हीच आमची खरी ताकद असून, याच विश्वासाच्या बळावर आम्ही ही यशाची शिखरे गाठली आहेत,” असे ते म्हणाले. तसेच सर्व संबंधितांचे अभिनंदन करत त्यांनी भविष्यातही अशीच प्रगती कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.बँकेच्या या भरीव यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी बँकिंग क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळात आणखी मोठी झेप घेण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
konkansamwad 
