शिरोडा वेळागर दुर्घटना......समुद्राने परत दिला सातवा मृतदेह
शिरोडा
शिरोडा वेळागर समुद्रात घडलेल्या दुर्घटनेत सातव्या मृतदेहाचा शोध लागला आहे. हा मृतदेह कालवी बंदर येथील समुद्र किनारी सापडला. दरम्यान बुडालेल्या सर्वजणांना शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. शुक्रवार दि. 3 ऑक्टोबर पासून सुरू झालेली ही शोध मोहीम अखेर कालवी बंदर येथील किनारी येऊन संपली. यावेळी स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने मृतदेह शोधण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

konkansamwad 
