कणकवली कनकनगर येथे कारने घेतला पेट

कणकवली  कनकनगर येथे कारने घेतला पेट

 

कणकवली

 

    कणकवली नरडवे रोडवरील कनकनगर येथे उभी असलेली एक कार आज अचानक पेट घेऊन जळाली. हि घटना सकाळी साडेआठच्या सुमारास  घडली. प्राथमिक माहितीनुसार ही सीएनजीवर चालणारी कार असून आगीत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई हुन दारिस्ते येथे जाणारे कुटुंब या कारमधून प्रवास करत होते. कारमध्ये बिघाड झाल्याने संबंधित कार रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. काही वेळातच कारच्या पुढील भागातून धूर निघू लागला आणि क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आणि स्थानिकांनी सुरक्षित अंतर राखत परिस्थिती पाहण्यासाठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांना कळविण्यात आले असून या नेमकी कोणत्या कारणामुळे लागले हे अजून स्पष्ट झाले नाही आहे.