वेंगुर्ला मदर तेरेसा स्कूलचा पूर्व-प्राथमिक पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न
वेंगुर्ला
मदर तेरेसा स्कूलचा शैक्षणिक वर्ष 2025- 26 सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा पूर्व-प्राथमिक पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून वेंगुर्ला नगरपालिका नगराध्यक्ष दिलीप गिरप तसेच प्रमुख पाहुणे, वेंगुर्ला नगरवाचनालय सचिव कैवल्य पवार, नगरसेवक प्रणव वायंगणकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत नृत्याने झाली, त्यानंतर सीनियर केजी ,जुनिअर केजी, नर्सरीच्या छोट्या मुलांनी सुंदर कोळीनृत्य, गोवन नृत्य तसेच कथा सांगितल्या, काही मुलांनी भाषणे दिली. अध्यक्ष भाषणात मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले तसेच या छोट्या मुलांवर उद्याच भविष्य अवलंबून आहे असे सांगितले. श्री. कैवल्य पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की लहान मुलांचे मानसशास्त्र हे आपल्याला समजून घेतल पाहिजे. शाळेचा शंभर टक्के निकाल लागतो त्याचप्रमाणे इथे मेहनतही तेवढीच घेतली जाते, असे सांगितले.यावेळी संस्थेचे मॅनेजर फादर फ्रान्सिस डिसोजा, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक फादर रॉजर डिसोजा, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख शिक्षिका सौ.सबिना फर्नांडिस व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या मुली माया राऊळ व स्वरा मांजरेकर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आभार सहा. शिक्षिका अँजेलीन फर्नांडिस यांनी मानले.
konkansamwad 
