कसाल हायस्कूलच्या १०० विद्यार्थ्यांना निलेश राणेंच्या हस्ते सायकल वाटप

कसाल हायस्कूलच्या १०० विद्यार्थ्यांना निलेश राणेंच्या हस्ते सायकल वाटप

कुडाळ

 

   तालुक्यातील कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या सौजन्याने प्रशालेतील १०० पेक्षा जास्त गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. या सायकलींमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास अधिक सोपा होणार आहे. या प्रसंगी श्री. राणे यांनी पाटकर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. सायकलींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी गती मिळेल आणि ही मदत त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिक्षणासाठी कष्ट घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या मदतीमुळे मोठे प्रोत्साहन मिळते, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, कुडाळ तालुका सभापती मिलिंद नाईक आणि महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांचा समावेश होता.तसेच महायुतीचे कार्यकर्ते, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य, स्थानिक सरपंच, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल कसाल परिसरातील पालकांनी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.