सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी प्रमोद कामत यांचे नाव निश्चित

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी प्रमोद कामत यांचे नाव निश्चित

सिंधुदुर्गनगरी 

 

     सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रमोद कामत यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यांच्या नावाला खासदार नारायण राणे यांनी पसंती दर्शवली. आज झालेल्या भाजपच्या बैठकीत त्यांचे स्वागत करण्यात आले असून सव्वा वर्षाचा कार्यकाळ त्यांना देण्यात आल्याचे समजते. याबाबतची अधिकृत घोषणा आज दुपारी तीन वाजेपर्यंत होणार आहे. भाजपकडून त्यांचे नाव फायनल करण्यात आले आहे तर अद्याप पर्यंत शिवसेनेकडून नेमका कोण हे कळू शकलेले नाही श्री. कामत यांनी याआधी जिल्हा परिषद सभापती म्हणून काम केले असून सामाजिक कामात ते कायम अग्रेसर आहे. कट्टर राणे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही संधी देण्यात आली आहे.