मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्ला येथे रमजान ईद उत्साहात साजरी
वेंगुर्ला
वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलमध्ये बुधवार, २५ मार्च २०२६ रोजी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेतील मुस्लिम पालक आणि विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी गोड पदार्थ शीरखुरमा प्रेमाने वाटप केला.या सणाच्या निमित्ताने सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद आणि एकतेचा संदेश दिला. यावेळी शाळेत आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकोप्याची आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ होते. प्रशालेतील मुख्याध्यापक फा. फेलिक्स लोबो, प्रभारी मुख्याध्यापक फा. राॅजर डिसोजा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व मुस्लीम पालकांस व विद्यार्थ्यांस शुभेच्छा दिल्या.
konkansamwad 
