कणकवलीत सहा दुकाने चोरट्यांनी फोडली

कणकवलीत सहा दुकाने चोरट्यांनी फोडली

 

कणकवली

 

    शहरात चोरट्यांचा धुमाकूळ पुन्हा सुरू झाला आहे. कणकवली आचरा मार्गावरील सना कॉम्प्लेक्स आणि त्या परिसरातील सहा दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. यापूर्वीच याच सना कॉम्प्लेक्समधील सोन्याचे दुकान चोरट्यांनी फोडले होते. मात्र त्याचा उलगडा अद्याप झालेला नाही.कणकवली शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास तब्बल सहा दुकाने चोरट्याने फोडल्याची घटना घडली आहे. कणकवली आचरा रोडवर गजबजलेल्या रस्त्यावर सीसीटीव्ही या भागांमध्ये असून देखील झालेल्या दुकानातील चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर आता एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. कणकवली आचरा रोड हा नेहमीच गजबजलेल्या स्थितीत असतो. या मार्गापासून काही अंतरावरच कणकवली पोलीस स्टेशन आहे. असे असताना देखील चोरट्याने आचरा रोड येथील सना कॉम्प्लेक्स मधील तीन तर त्यापासून काही अंतरावर असणाऱ्या बेंगलोर अय्यंगार बेकरीच्या बाजूचे राज मेडिकल व अन्य तीन दुकानांची शटर उचकटून त्यामध्ये चोरी केल्याची घटना घडली. या चोऱ्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे.