कुडाळ तालुका महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी शिल्पा घुर्ये

कुडाळ तालुका महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी शिल्पा घुर्ये

 

कुडाळ

 

     तालुक्यातील महिला व्यापाऱ्यांना संघटित करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी 'कुडाळ तालुका महिला व्यापारी संघटना' स्थापन करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारिणी सदस्य संजय भोगटे यांच्या पुढाकाराने या संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून, यावेळी तालुक्यातील महिला व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि कुडाळ तालुका व्यापारी संघटना यांच्याशी संलग्न असलेल्या या नूतन संघटनेच्या अध्यक्षपदी सौ. शिल्पा हरेश घुर्ये यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्षपदी स्नेहल हेमंत कुडाळकर, कार्यवाह म्हणून सुप्रिया शिवप्रसाद राणे, खजिनदारपदी अपर्णा अवधूत शिरसाट, तर सहकार्यवाह म्हणून उन्नती उमेश राणे यांची निवड झाली आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रिया विद्याप्रसाद बांदेकर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडीवेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अवधूत शिरसाट, सहकार्यवाह राजन नाईक, संजय भोगटे, कुडाळ तालुका व्यापारी संघाचे उपाध्यक्ष संदेश पडते, बाळा कोरगावकर, कार्यवाह महेश ओटवणेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.नवनिर्वाचित कार्यकारिणीने येत्या काही दिवसांत उर्वरित सदस्यांची नावे जाहीर करण्यात येतील, असे सांगितले आहे. महिला सबलीकरण आणि व्यापार उद्योगाला चालना देण्यासाठी ही संघटना प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे. जिल्हा व्यापारी महासंघातर्फे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.