युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते 'निरवडे महोत्सव-२०२६' चे उद्घाटन

युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते 'निरवडे महोत्सव-२०२६' चे उद्घाटन

 

सिंधुदुर्ग

 

    निरवडे ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळांने आयोजित केलेल्या "निरवडे महोत्सव २०२६" चे आज शुक्रवारी सायंकाळी निरवडे येथे जल्लोषी वातावरणात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा युवा नेते श्री. विशाल परब यांनी केले. या कार्यक्रमाला श्री विशाल परब यांच्या समवेत सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, कणकवली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर, सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती श्रीमती सुष्मिता जाधव, तळवडे मतदार संघातील जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. संदीप गावडे, सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती श्री. गौरव मुळीक उपस्थित होते. या विशाल कार्यक्रमातून आमच्या निरवडे गावचा कला संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी राजकीय शक्तीची सकारात्मक साथ नेहमीच लाभणार असल्याचा संदेश यानिमित्ताने सावंतवाडी वासियांसमोर गेल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.या कार्यक्रमाचे आयोजन समस्त निरवडे ग्रामस्थ आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ माळकरवाडी यांच्यावतीने अत्यंत सुनियोजित पद्धतीने करण्यात आले होते. या महोत्सवासाठी केतन आजगावकर (भाजपा सोशल मीडिया प्रमुख सावंतवाडी),महेंद्र गावडे (तंटामुक्ती अध्यक्ष), दादा परब (ग्रामपंचायत सदस्य तळवडे) निखिल माळकर (अध्यक्ष), सुनिल माळकर (उपाध्यक्ष), अर्जुन पोपकर (सचिव), चंदन गोसावी सर, तिवरेकर सर (मार्गदर्शक), विशाल पोपकर (खजिनदार), सदस्य - चेतन माळकर, सचिन माळकर, नितेश माळकर, विराज पोपकर, संजय माळकर, राजाराम माळकर, किशोर माळकर उपस्थित होते. चटकदार फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक रंगतदार कार्यक्रमांची मेजवानी हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले होते.