वेंगुर्लेत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्लेत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ले

 


          वेंगुर्ले तालुका महिला शहर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक काथ्या कारखाना कॅम्प वेंगुर्ले येथे संपन्न झाली.यावेळी महिला सक्षमीकरण तसेच महिलांना शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली. तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच तालुकास्तरावर भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात येणार असून या मेळाव्यात पक्षातील दिग्गज नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14  एप्रिल रोजी  वेंगुर्ले तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित तालुक्यात विविध कार्यक्रम करून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे प्रदेश सचिव एम. के. गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, महिला तालुकाध्यक्ष ऋतुजा शेटकर, तालुका उपाध्यक्ष सुभाष दळवी, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, शहर अध्यक्ष सुरज परब, युवती अध्यक्ष निधी शिरोडकर, शिल्पा परब, सचिन कोंडये, सुनील नाईक, तेजस्वी गावडे यांच्यासहीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.