वेंगुर्ला मंडल प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे संपन्न
आंबोली
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मंडलाचा निवासी प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भाजपाचे जेष्ठ नेते व वक्ते विलास हडकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.प्रशिक्षण वर्गात अभियान जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब, नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, राज्य परिषद सदस्य राजु राऊळ, नगरसेवक रविंद्र शिरसाठ, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे उपस्थित होते.प्रशिक्षण वर्गात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी इतिहास आणि विकास, विलास हडकर यांनी वैचारीक अधिष्ठान, महेश मांजरेकर यांनी आपल्या सरकारची कामगीरी, श्रीकृष्ण परब यांनी सोशल मिडीया - नमो अँप - सरल अँप, गुरुनाथ उर्फ राजु राऊळ यांनी कार्यपध्दती, संदिप गावडे यांनी बुथव्यवस्थापन व SIR, रविंद्र मडगांवकर यांनी कार्यविस्ताराची आमची दृष्टी या विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षण वर्गाचे संयोजक व ता.सरचिटणीस वसंत तांडेल यांचे सहकार्य लाभले. या प्रशिक्षण वर्गास ७५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.
konkansamwad 
