कुडाळमध्ये आत्मनिर्भर नारी - प्रेरणा पर्व उत्साहात संपन्न
कुडाळ
डायरेक्ट सेलिंग उद्योगात गेली १२ वर्ष यशस्वी काम करणारी Milifestyle marketing Global Pvt. Ltd या डायरेक्ट सेलिंग कंपनीच्या माध्यमातून “आत्मनिर्भर नारी – प्रेरणा पर्व, यशस्विनींचा सन्मान 2026” हा भव्य कार्यक्रम १५ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुंबईस्थित कोकणचे सुपुत्र निलेश पटलेकर, प्रमोद गावडे, अजित शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या उद्योजिका सौ. गीतांजली पेडणेकर- गवंडे यांनी महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रेरणादायी विचार मांडले. वाचन आणि प्रवास या २ गोष्टीतून खूप काही शिकता येत, मीही शिकले तुम्ही जमेल तस वाचन आणि प्रवास करा. माझ व्यक्तिमत्त्व घडवण्याचं सर्व श्रेय माझे आईवडील आणि कुटुंबिय आणि लाभलेल्या सर्व गुरुवर्य यांचं आहे. दिसण्यापेक्षा स्वतःच्या असण्याला महत्त्व द्या, कोणतही काम असू दे प्रामाणिक पणाने करा. उद्योजक घडवून घडत नसतो ते स्वप्न ती जिद्द आत कुठेतरी असावी लागते, स्वतःला तस बनवण्यावर भर द्या असे मोलाचे मार्गदर्शन सौ गीतांजली पेडणेकर गवंडे यांनी केले. सदर कार्यक्रमाला ३०० पेक्षा जास्त महिलांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. याप्रसंगी व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या लक्ष्मी पिळणकर, श्रुती सातारडेकर, रुपाली सामंत, जान्हवी केरकर, आसिया खुल्ली, साक्षी सावंत, विनया वायंगणकर, मनीषा आडारकर आणि इतर अनेक यशस्वी महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोअर ग्रुपचे नेते बालकृष्ण पिळणकर, विनोद पिळणकर, सतीश गावस, आकाश गावडे, अमोल नाईक, सुजन मुद्राळे आणि रंजन नाईक यांनी मोलाचे योगदान दिले. हा सोहळा केवळ सन्मान सोहळा न राहता, प्रत्येक महिलेला आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी बळ देणारा ठरला.
konkansamwad 
