मदर तेरेसा स्कूलचे बी.डी.एस्. परीक्षेत दैदिप्यमान यश
वेंगुर्ला
मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्ला येथील विद्यार्थ्यांनी ११ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (BDS) परीक्षेत उज्ज्वल व उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता पहिलीतील कु. विराज विशाल जाधव याने १० वा क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवून विशेष प्राविण्य मिळवले. कु. अर्वी विजय तांडेल हिने कांस्यपदक मिळवत यशाची परंपरा कायम राखली. तसेच इयत्ता तिसरीतील कु. अन्वय जगदीश सापळे याने रौप्यपदक मिळवून शाळेचा गौरव वाढवला.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक फा. फेलिक्स लोबो, प्रभारी मुख्याध्यापक फा. रॉजर डिसोजा, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही असेच यश मिळवत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
konkansamwad 
