भरधाव ट्रकने दुचाकीस्वारासह दोन गाईंना चिरडले....गगनबावडा येथील घटना

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारासह दोन गाईंना चिरडले....गगनबावडा येथील घटना

वैभववाडी

 

     करूळ घाटातून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडत आणखी सात वाहनांना धडक दिली. यात भरधाव वेगाने जात असताना त्या तरूणासह दोन गाईंचा जागीच मृत्यू झाला. गगनबावडा बसस्थानक चौकात घडली. अखिल रमजान थोडगे (वय २२, रा. गगनबावडा कातळी) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातानंतर अपघातामुळे बिथरलेला ट्रक चालक विजय बापू शिंदे याचा गाडीवरील ताबा पूर्णपणे सुटला. हा अनियंत्रित ट्रक पुढे चौकात उभ्या असलेल्या वाहनांवर काळ बनून धावला. ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला, मिनी ट्रॅव्हल्सला आणि एका कारला एकापाठोपाठ एक जोरदार धडक दिली. सुदैवाने या वाहनांमध्ये त्या वेळी प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.ट्रकचा हा थरारक वेग एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पुढे आणखी चार दुचाकींना चिरडले, ज्यामध्ये त्या सर्व दुचाकींचा चक्काचूर झाला. याच वेळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या गाईंच्या अंगावरून हा ट्रक गेल्याने दोन निष्पाप मुक्या गाईंचा जागीच बळी गेला. अखेर सर्वांना धडका देत हा ट्रक बाजूच्या एका दुकानात घुसला. यावेळी दुकानात उभी असलेली एक महिला किरकोळ जखमी झाली. या विचित्र आणि साखळी अपघातात मिनी ट्रॅव्हल्स, कार, दुचाकी आणि दुकानाचे मिळून लाखोंचे नुकसान झाले आहे. जखमींवर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, फरार झालेल्या ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याविरुद्ध गगनबावडा पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.डी. साळुंखे करत आहेत.