आशावादी राहा, निराश होऊ नका......वेंगुर्ल्यात कार्यकर्त्यांना खा. नारायण राणेंचा सल्ला

आशावादी राहा, निराश होऊ नका......वेंगुर्ल्यात कार्यकर्त्यांना खा. नारायण राणेंचा सल्ला

वेंगुर्ला दि. ३१

 

      पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नेहमी आशावादी राहावे. कोणीही निराश होऊ नये. गरीब-श्रीमंत हा नशिबाचा भाग असला तरी काम आणि मेहनत करत राहणे महत्त्वाचे आहे, असे मोलाचे मार्गदर्शन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी वेंगुर्ला येथे केले.भाजपा कार्यालयात आयोजित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी जिल्हा परिषद सभापती प्रितेश राऊळ, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वेंगुर्ल्याची माणसं आणि येथील निसर्ग आपल्याला फार आवडतो. सिंधुदुर्गात आल्यानंतर किमान एकदा तरी वेंगुर्ल्यात फेरफटका मारण्याची इच्छा असते, असे राणे म्हणाले.1990 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण सिंधुदुर्गात आलो. बाळासाहेबांच्या विचारांतून अनेक गोष्टी आत्मसात केल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचता आले. या पदांचा उपयोग नेहमी लोकहितासाठी केला, याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.