सिंधुदुर्गच्या अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली...... सतीश बागल यांची पदोन्नतीने नियुक्ती
सिंधुदुर्गनगरी, ता. ३१
जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या रिक्त पदावर सतीश पंढरीनाथ बागल यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. शासनाच्या 24 ऑगस्ट 2026 च्या आदेशानुसार आस्थापना मंडळाच्या शिफारशीनंतर निवडश्रेणी उपजिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे.त्यानुसार सतीश बागल यांना अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या पदावर रुजू होण्यासाठी त्यांच्या सध्याच्या पदावरून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवीन अपर जिल्हाधिकारी मिळणार असून, सतीश बागल लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
konkansamwad 
