गोकुळ दुध संघातील विजयाबद्दल सिंधुदुर्ग काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून सतेज पाटील यांचे अभिनंदन

गोकुळ दुध संघातील विजयाबद्दल सिंधुदुर्ग काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून सतेज पाटील यांचे अभिनंदन

कोल्हापूर

    गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची गगनबावडा येथे भेट घेऊन अभिनंदन केले.गोकुळची निवडणूक महायुतीने प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह दहा आमदार, एक खासदार असे सर्व बळ महायुतीने लावले होते. मात्र काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी एकट्याने लढत दिग्गजांचा पराभव केला.हा विजय कोल्हापूरच्या मातीतील निस्वार्थ कार्याचा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाचा विजय असल्याच्या भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.यावेळी प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रकाश जैतापकर, नागेश मोर्ये, रविंद्र म्हापसेकर, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, प्रदिप मांजरेकर, अभय मालवणकर, बाबू गवस, भालचंद्र जाधव, जेम्स फर्नांडिस, युवक अध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.