आंतरशालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत वेळकर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

आंतरशालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत वेळकर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

वेंगुर्ला

       येथे झालेल्या २३ व्या आंतरशालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत वेळकर कराटे-डो अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. प्रशिक्षक महादेव धोंडू वेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ शाळांतील १४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी ९ सुवर्ण, ७ रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण २५ पदके जिंकली. तसेच उत्कृष्ट संघाची ट्रॉफीही पटकावली.

यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे -

गजानन विद्यालय, पाट - मिहीर मनोज परब (२ कांस्य), आरुष विठ्ठल राऊळ (२ कांस्य), गुंजन गुंडू खोरजुवेकर (१ सुवर्ण, १ रौप्य), तनया तुकाराम गोसावी (१ सुवर्ण, १ कांस्य)

एस. एल. देसाई विद्यालय, पाट - राजदत्त गिरी प्रसाद राऊळ (२ कांस्य), हर्षदा गणेश जोशी (१ सुवर्ण)

अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे - तौफिक इम्तियाज अंसारी (२ सुवर्ण), संकेत धाकू झोरे (२ रौप्य), दिक्षा नागेश बुट्टे (१ सुवर्ण, १ रौप्य), दिव्या विलास परब (२ रौप्य), प्रणाली श्रीराम केसरकर (१ सुवर्ण, १ कांस्य)

जि. प. शाळा माडयाची वाडी - संस्कृती संतोष परब (१ रौप्य, १ कांस्य)

जि. प. शाळा पाट नं. १ - गुरुराज महेश दाभोलकर (१ सुवर्ण)

जि. प. शाळा चेंदवण नं. १ - सुरेश विठ्ठल परब (१ सुवर्ण)