मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत नावनोंदणी व दुरुस्तीसाठी बीएलओंशी संपर्क साधावा.......जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत नावनोंदणी व दुरुस्तीसाठी बीएलओंशी संपर्क साधावा.......जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. १६ 

       भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली आहे.या मोहिमेअंतर्गत मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन पात्र मतदारांनी, तसेच मतदार यादीतील नाव, रहिवासी पत्ता किंवा अन्य तपशिलांमध्ये दुरुस्ती अथवा बदल आवश्यक असलेल्या मतदारांनी संबंधित केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (BLO) यांच्याशी त्वरित संपर्क साधून आवश्यक अर्ज व कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.