'फार्म आयडीची सक्ती रद्द करा'......शेतकरी कर्जमुक्तीसाठी संजू परब यांचे महसूलमंत्र्यांकडे निवेदन
सावंतवाडी
शेतकरी कर्जमुक्ती योजना 2025 मधील फार्म आयडीची अट शिथिल करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने हे निवेदन देण्यात आले.निवेदनात फार्म आयडीच्या सक्तीमुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहत असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे शासनाने ही अट तातडीने शिथिल करून सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली.शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख दिनेश गावडे, विनायक दळवी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
konkansamwad 
