शिरोडा केरवाडा शाळेत ‘जीवन कौशल्य विकास’ उपक्रमाचा शुभारंभ

शिरोडा केरवाडा शाळेत ‘जीवन कौशल्य विकास’ उपक्रमाचा शुभारंभ

 

शिरोडा

 

     जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, शिरोडा केरवाडा येथे इयत्ता ५ वी ते ७ वीतील विद्यार्थ्यांसाठी ‘जीवन कौशल्य विकास’ या उपक्रमाचा शुभारंभ दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आला. या कार्यक्रमात समुपदेशक म्हणून श्री. राजीव कुबल (निवृत्त नौदल अधिकारी) यांनी मार्गदर्शन केले.उपक्रमाचा उद्देश मुलांना बोलके बनविणे तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वात विविध जीवन कौशल्ये रुजविणे हा आहे.हा कार्यक्रम आठवड्यातून एकदा एका तासाचा असेल व पुढील आठ आठवडे राबविला जाणार आहे. या प्रसंगी श्री. शरद परुळेकर, श्री. बाबा नाईक, शाळेचे मुख्याध्यापक श्री. किरण मुडशी, शिक्षकवृंद – श्री. रवींद्र ढोले, श्रीमती सम्रता चव्हाण, श्री. दुर्गेश हलमारे, श्रीमती तनुजा रेडकर, श्रीमती रोशनी मालवणकर, तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.