सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा १४ ऑगस्टला.....६ ऑगस्टची आमसभा रद्द
सावंतवाडी
सावंतवाडी पंचायत समितीची गुरुवार 6 ऑगस्ट रोजी होणारी आमसभा अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. ही सभा आता शुक्रवार 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.6 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात ही सभा होणार होती. मात्र नवीन नियोजनानुसार ही आमसभा 14 ऑगस्टला सकाळी 10.30 वाजता त्याच ठिकाणी पार पडणार आहे.या बदलाची सर्व संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी निलेश जाधव यांनी केले आहे.
konkansamwad 
