परुळे येथील विनायक शेखर जोशी तबला विशारद परीक्षेत प्रथम
परुळे
परुळे येथील कु. विनायक शेखर जोशी यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय च्या तबला विशारद परीक्षेत 483 मार्क्स मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. परुळे मधील प्रथमच तबला विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.विनायक शेखर जोशी यांनी बऱ्याच राष्ट्रीय कीर्तनकारांना साथ केली आहे. शृंगेरी येथे आद्यगुरु श्री. शंकराचार्य यांच्या समोर त्यांनी सेवा अर्पण केली आहे. मुंबई येथे श्री. शरद पवार यांच्या समोर वादन तसेच शिवराज मंच मालवण च्या शिवराज भूषण या नाटकाला पखवाज साथ केली आहे.त्यांनी कर्नाटक, उडूपी, मुंबई, पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर, सज्जनगड, माहूरगड, अक्कलकोट अश्या बऱ्याच ठिकाणी तबला साथ केली आहे. आर्ट बीट फौंडेशन चा त्यांना पुरस्कारही मिळाला आहे.तबल्याच्या शिक्षणाचे बाळकडू त्यांनी तबला अलंकार श्री. अरुण केळुस्कर यांच्या कडून घेतले. तसेच श्री. महेश सावंत यांच्याकडून, ह.भ.प श्री. चिंतामणी सामंत यांच्याकडून कीर्तनातील थोडं शिक्षण घेतले आहे.
konkansamwad 
