जिल्ह्यातील एकमेव शाळा! सावंतवाडीच्या कळसुलकर शाळेचे शिष्यवृत्तीत दमदार यश, 21 विद्यार्थी ठरले पात्र
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमधील सातत्यपूर्ण यशासाठी ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेने यंदाच्या इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 21 विद्यार्थी पात्र करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. धारा महेंद्र कोरगावकर, वेद गोपाळ गवस, चेतन्य प्रदीप सावंत, कृष्णा उमेश पायशेट, रत्नाराम सोपाराम रबारी, चैत्राली लक्ष्मण काळे, कौस्तुभ कृष्णा पास्ते, श्रेष्ठ विठोबा कडव, सार्थक धोंडी वरक, अवनी प्रताप आवटे, कौशल सदगुरू मसुरकर, सार्थक शांताराम नाईक, गार्गी रुपेशकुमार गुंजाळ, संकेत शरद परब, शौर्य विशाल अपराध, गार्गी विशाल पई, नील रामचंद्र धुरी, नीरजा अभय चव्हाण, अर्णव रामदास कोरगावकर, तन्वी दीपक सरमळकर आणि युवानी शंकर पांगम हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. पहिली ते चौथीपर्यंत 200 हून अधिक विद्यार्थी असलेल्या या शाळेत अभ्यासासोबतच कला, क्रीडा, विज्ञान, पर्यावरण आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम नियमित राबविले जातात त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो आणि पालकांचा विश्वासही वाढला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक तसेच संस्थेचे संचालक श्री. शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, केंद्रप्रमुख श्री कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत आणि सर्व शिक्षक, पालक व हितचिंतकांचे अभिनंदन करण्यात आले असून जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण आणि उपक्रमशील शिक्षण देणारी अग्रगण्य शाळा म्हणून कळसुलकर शाळेची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
konkansamwad 
