सावंतवाडीच्या ट्रॅफिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी उद्या सर्वपक्षीय बैठक.....नवीन पोलीस निरीक्षकांसोबत नगराध्यक्षांची सदिच्छा भेट
सावंतवाडी
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.या भेटीदरम्यान शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर सविस्तर चर्चा झाली. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी उद्या नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी 12 वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीत पोलीस निरीक्षक व ट्रॅफिक पोलीस विभाग, एस.टी. महामंडळाचे अधिकारी, स्थानिक वाहतूक संघटना, ऑटो रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, पालिकेचे मुख्याधिकारी, सर्व सभापती आणि नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. शहरातील वाहतूक कोंडीवर तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजना आखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना एकाच मंचावर आणून चर्चा केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
konkansamwad 
