वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी साजरी
वेंगुर्ला
वेंगुर्ला येथील राऊळवाडा पेट्रोल पंप लगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका कार्यालयामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात राणी लक्ष्मीबाई प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, ज्येष्ठ नेते जी.जी.टांककर, जिल्हा सचिव सुशील चमणकर आणि तालुका सरचिटणीस संदीप सातार्डेकर, ॲड मनीष सातार्डेकर उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थित यांना मार्गदर्शन करताना झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने ब्रिटिश सत्ते विरुद्ध लढा दिला 1857 च्या स्वातंत्र्य समरात त्यांनी इंग्रजा विरुद्ध शौर्याने युद्ध केले. झाशीचे संरक्षण केले. त्यांच्या या बलिदानामुळे अनेक भारतीयांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली.आणि त्या स्त्रियांसाठी आदर्श ठरल्या. त्यामुळे त्यांना भारताच्या स्वातंत्र लढ्यातील महान विरांगणा म्हणून ओळखले जाते. त्यांचे विचार घराघरात पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये तालुका सचिव ओबीसी सेल उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर, सचिन कोंडये, माजी उपसरपंच गणपत केळुस्कर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मोटे, युवा नेते धैर्यशील टांककर, युवा तालुकाध्यक्ष गजानन कुंभार, श्याम नवार, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
konkansamwad 
