गणरायाच्या साक्षीने माणुसकीचा जागर.......रक्ताची तातडीची गरज कळताच गोवा बांबोळी गाठत केले रक्तदान

गणरायाच्या साक्षीने माणुसकीचा जागर.......रक्ताची तातडीची गरज कळताच गोवा बांबोळी गाठत केले रक्तदान

शिरोडा


     घरात गणरायाचे आगमन झाले असताना उत्सवाच्या आनंदासोबतच माणुसकीचे भान जपत रामपुरुष युवा मित्र मंडळ, शिरोडा-परबवाडी यांनी समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे.गोवा येथील बांबोळी रुग्णालयात रक्ताची तातडीची गरज असल्याची माहिती मिळताच, मंडळाचे देऊ उर्फ अण्णा परब आणि राजन धानजी यांनी क्षणाचाही विलंब न करता गोवा बांबोळी गाठले आणि रक्तदान केले.गणपती उत्सवाच्या काळात अनेकजण आपल्या आनंदात व्यस्त असताना, गरजू रुग्णासाठी वेळेत धावून जात रक्तदान करण्याचा या दोघांचा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे रामपुरुष युवा मित्र मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.‘उत्सव गणरायाचा, संकल्प माणुसकीचा’ या भावनेतून केलेली ही सेवा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.