प्राधिकरणातील होर्डिंग्ज, पोस्टर, फलक, बोर्ड आठ दिवसात काढावेत......अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या सूचना
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात विविध प्रकारचे (राजकीय, सामाजिक, वैयक्तिक शुभेच्छा) इ. प्रकारचे होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक बोर्ड विनापरवानगी लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. असे लावण्यात आलेले सर्व प्रकारचे होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक बोर्ड इ. सदरची सूचना प्रसिध्द झाले पासून आठ दिवसात काढण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी, व सचिव सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिल्या. आठ दिवसात होर्डिंग्ज, पोस्टर, फलक, बोर्ड इ. जाहिराती आपले स्तरावरून न काढल्यास कोणत्याही प्रकारची सूचना न देता होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक, बोर्ड या कार्यालयाकडून काढून टाकण्यात येतील व त्यासाठी येणारा खर्च महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार आपणाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच भविष्यात प्राधिकरण क्षेत्रात होर्डिंग्ज, पोस्टर, फलक बोर्ड इ. लावायचे झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
konkansamwad 
