तुळस येथे युवकाचा विहिरीत पडून मृत्यू....
वेंगुर्ले
सावंतवाडी तालुक्यातील आजगाव शेटकरवाडी येथील रहिवासी मनीष गुंडू आजगावकर (वय ३२) या युवकाचा मृतदेह रविवारी सायंकाळी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे एका विहिरीत आढळून आला. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मनीष आजगावकर हा काही दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. नातेवाईक त्याचा शोध घेत होते. रविवारी सकाळी तो सावंतवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी त्याला तेथे गाठले. मात्र तो आजगाव येथे घरी जाण्यास तयार नव्हता.त्यानंतर तो तुळस येथे आपल्या मामाकडे आला होता. सायंकाळी घराच्या बाजूला असलेल्या विहिरीत तो मृतावस्थेत आढळून आला. मानसिक संतुलन बिघडल्याने तोल जाऊन विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत वेंगुर्ले पोलीस अधिक तपास करीत आहेत. मयत मनीष याच्या पश्चात आई, वडील, मामा असा परिवार आहे.
konkansamwad 
