वेंगुर्ला येथे 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या; वेतोरे-वरचीवाडी येथील घटना
वेंगुर्ला, ता. २८
तालुक्यातील वेतोरे-वरचीवाडी येथे एका 22 वर्षीय तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली. राज गोविंद नाईक (वय 22) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज नाईक हा मुळदे येथील हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. बुधवारी त्याची आई कणकवली न्यायालयात नोकरीसाठी गेल्या होत्या तर वडील गोविंद नाईक हे सायंकाळी 4 वाजता चारा आणण्यासाठी गेले होते. सायंकाळी 6 वाजता वडील घरी परतले असता घराचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी मागील दरवाजाने प्रवेश केला असता राज बेशुद्ध अवस्थेत आढळला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरवण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत राज हा वेतोरे येथील भाजपचे कार्यकर्ते गोविंद उर्फ दीपक नाईक यांचा मुलगा होता.
konkansamwad 
