कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथे १० जून रोजी संयुक्त दशावतार नाटक

कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथे १० जून रोजी संयुक्त दशावतार नाटक

 


कुडाळ

 

         कुडाळ तालुक्यातील  तेंडोली-खरावतेवाडी येथील दादा गावडे यांच्या घरानजीक 10 जून रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्ह्यातील निवडक दशावतार कलाकारांचे “राजा रुक्मांगत” हे संयुक्त दशावतार नाटक आयोजित करण्यात आले आहे. या नाटकातील कलाकार- गणपती-विनायक सर्वेकर, रिद्धी-सिद्धी- चैतन्य गावडे, राजा रुक्मांगत-संजय वालावलकर, कलीदेव-महेश गवंडे, यमधर्म-सतीश बागवे, देवदूत / विष्णू-गिरीश राऊळ, देवदूत /राणी-सिद्धेश मुणनकर, मडवळ-मंगेश साटम, मडवळीन-विनायक सर्वेकर, इंद्र-विलास तेंडोलकर, नारद-बाळू कोचरेकर, माळी-बाबा कामत, सुंदरी-दीप निर्गुण कलाकार आहेत. तर संगीत साथ-हार्मोनियम-अमोल मोचेमाडकर, पखवाज-दादा आकेरकर, झांज- प्रथमेश गावडे यांची आहे.