तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जन आरोग्य समितीची स्थापना.....सुजाता पडवळ यांची अध्यक्षपदी निवड
तुळस
प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस येथे जन आरोग्य समितीची सभा उत्साहात संपन्न झाली. शासनाच्या दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ च्या निर्णयानुसार जन आरोग्य समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र लिलके यांची सहअध्यक्ष म्हणून तर आरोग्य सहाय्यक व रुग्ण कल्याण समिती सदस्य सचिव दयानंद गवस यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सभेला पदसिद्ध सदस्य म्हणून जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी मिलिंद मोळके, आयुष वैद्यकीय अधिकारी सानिया खान, वरिष्ठ स्टाफ शिल्पा आंबेकर, ग्रामपंचायत आरोग्य उपसमितीचे सभापती सचिन नाईक, महिला व बालविकास विभागाच्या क्षेत्रिय पर्यवेक्षिका शर्मिष्ठा सामंत, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रतिनिधी द्रौपदी नाईक, तालुकास्तरीय शिक्षण विभाग अधिकारी संतोष गोसावी आणि तालुकास्तरीय सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी प्रितम पवार उपस्थित होते. यासोबतच विविध गावातील सरपंच, सदस्य, पदाधिकारी, यांनीही या सभेत सहभाग घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटीकरणासाठी व आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
konkansamwad 
