मदर तेरेसा स्कूलची शिष्यवृत्ती परीक्षेत चमक; विजय तुळसकर शहरी विभागात प्रथम

मदर तेरेसा स्कूलची शिष्यवृत्ती परीक्षेत चमक; विजय तुळसकर शहरी विभागात प्रथम

 

वेंगुर्ला

 

    मदर तेरेसा हायस्कूल, वेंगुर्ला येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.इयत्ता ८ वी चा विद्यार्थी *विजय दिनेश तुळसकर* याने शहरी विभागात प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्यात ३७ वा क्रमांक मिळवला आहे. तर इयत्ता ४ थी चा विद्यार्थी *सुजय प्रशांत परब* याने शहरी विभागात चतुर्थ क्रमांक मिळवत जिल्ह्यात ४० वा क्रमांक प्राप्त केला आहे.या दोन्ही विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.