गणेशोत्सवात रविंद्र चव्हाणांचे मूळ गावी बाप्पाला साकडे

गणेशोत्सवात रविंद्र चव्हाणांचे मूळ गावी बाप्पाला साकडे

मालवण, दि. १५ 

 

    गणेशोत्सव निमित्ताने मालवण तालुक्यातील पेंडूर या मूळ गावी ऋषीपंचमी दिवशी आयोजित विशेष पूजेला भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी सहकुटुंब उपस्थित राहत घरच्या बाप्पांचे मनोभावे पूजन केले.यावेळी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी, बळीराजाच्या उन्नतीसाठी तसेच माता-भगिनी आणि युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. समाजात सुख, शांतता आणि समृद्धी नांदावी, अशीही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूळ गावी परतण्याचा आनंद चव्हाण कुटुंबीयांनी अनुभवला. गावची माती, आपली माणसं आणि घरच्या बाप्पांचे दर्शन यामुळे बालपणीच्या असंख्य आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. या भावनिक वातावरणाने मनाला विलक्षण समाधान मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.कोकणातील गणेशोत्सवाला लाभलेली परंपरा आणि भावनिक नाते या निमित्ताने पुन्हा अनुभवायला मिळाले. घरच्या बाप्पांच्या पूजनावेळी कुटुंबीयांनी एकत्रितपणे भक्तिभावाने आरती व पूजा केली. त्यामुळे पेंडूर येथील वातावरण भक्तिमय झाले होते.