सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेत खासदार नारायण राणे यांच्या हस्ते महाआरती

सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेत खासदार नारायण राणे यांच्या हस्ते महाआरती

कुडाळ

 

       येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन खासदार नारायण राणे व सौ. नीलम राणे, आमदार निलेश राणे यांनी घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली.कुडाळ येथे राणे कुटुंबीयांच्या वतीने गेली १७ वर्षे सिंधुदुर्ग राजा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, अशोक सावंत, माजी जिल्हा परिषद सभापती सौ. अस्मिता बांदेकर, जिल्हा महिला प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, रूपेश कानडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन सावंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, शहर प्रमुख अभिषेक गावडे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, पप्या तवटे, रचना नेरुरकर, भाजप शहर अध्यक्ष सुनील बांदेकर, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर आदी उपस्थित होते.