सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ६७ लिपिक पदांची भरती; ३ सप्टेंबरपासून अर्ज सुरू

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ६७ लिपिक पदांची भरती; ३ सप्टेंबरपासून अर्ज सुरू

सिंधुदुर्ग, ता. 28

 

    येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 67 लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे. बँकेने यापूर्वी आयबीपीएसमार्फत भरती प्रक्रिया राबवून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. आता नव्याने मंजूर झालेल्या 67 लिपिक पदांसाठी देशातील नामांकित अशा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेमार्फत ही प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी बँक आणि टीसीएस यांच्यात अधिकृत करार करण्यात आला आहे. टीसीएसने दिलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक 3 सप्टेंबर 2026 पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 17 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची शेवटची मुदत असेल. तसेच ही ऑनलाईन संगणकीय परीक्षा 18 ऑक्टोबर 2026 च्या सुमारास घेण्यात येणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित पद्धतीने होणार आहे. भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि अटी-शर्तीची माहिती बँकेच्या http://www.sindhudurgdcc.bank.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. उमेदवारांनी 1 सप्टेंबर 2026 नंतर बँकेच्या वेबसाईटला नियमित भेट देऊन अद्ययावत माहिती घ्यावी, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.