गोवा बनावटी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाला अटक

गोवा बनावटी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाला अटक

दोडामार्ग

 

      येथील सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका संशयिताला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ लाख ५१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयिताला गजाआड करण्यात आले आहे. प्रसाद शंकर गुणाजी (वय ३० वर्षे, रा. लक्ष्मी गल्ली, हलगा व्ही.टी.सी., ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.दोडामार्ग पोलीस सीमा तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असताना, गोव्याकडून येणाऱ्या एका वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली. ही दारू विनापरवाना आणि चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी संशयित प्रसाद गुणाजी याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी सीमा तपासणी नाक्यावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.