कणकवली येथील बाळगोपाळ हनुमान मंदिराची फंडपेटी फोडली

कणकवली
कणकवली शहरातील भालचंद्र आश्रम संस्थानलगतच्या बाळगोपाळ हनुमान मंदिरातील फंडफेडी अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. आज सकाळी स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. कणकवली शहरात काही दिवसापूर्वी सना कॉम्प्लेक्स येथील सराफी पेढी फोडण्यात आली होती. या चोरीचा तपास अजूनही लागलेला नाही. त्यात आता बाळ गोपाळ हनुमान मंदिरातील फंडपेटी फोडण्यात आली आहे. फंडपेटीचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आतील रोकड लंपास केली आहे. त्याचबरोबर कडी कोयंडा तोडण्यासाठी आणलेली काटवणी तेथेच टाकून चोरट्यांनी पलायन केल्याचे दिसून आले आहे. कणकवली शहरात दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे यावर ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी होते आहे.