मेढा ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन थाटात संपन्न

मेढा ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन थाटात संपन्न

 

परुळे
     ग्रामपंचायत कार्यालय मेढाच्या ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन शनिवारी  12 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सकाळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न   झाले. सदर इमारत स्व. बाबासाहेब ठाकरे मातोश्री योजना ग्रामपंचायत इमारत बांधणे या निधीतून 20 लाखरुपये मंजूरकरण्यातआले आहेत. 
    यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री दिनेश पाटकर, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री महादेव शिंगाडे, उपअभियंता पाणी पुरवठा श्री प्रफुल्ल कुमार शिदे, सरपंच श्री अवधूत रेगे, किंजवङे ग्रामपंचायत अधिकारी श्री शिवराज राठोड, ग्रामपंचायत अधिकारी श्री शरद शिंदे,  उपसरपंच श्री गोविंद जाधव, सदस्यांसह माजी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.