वेंगुर्लेच्या वरद जगतापचे रायफल शूटिंग स्पर्धेत यश; विभागीय स्पर्धेसाठी निवड
वेंगुर्ला
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धा दिनांक ३ ऑक्टोबर रोजी पार पडली.या स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी वरद विश्वनाथ जगताप याने पीप साईट या प्रकारामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे त्याची १५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.वरदने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सचिव दत्तात्रय परुळेकर, संचालक प्रशांत नेरुरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
konkansamwad 
