तुळस येथे १९ ऑक्टोबरला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
सिंधुदुर्ग
सामाजिक बांधिलकी जपत आणि मानवसेवेचा वसा पुढे नेत, वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे १९ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस (तुळस देव जैतिराश्रीत संस्था, मुंबई बहुउद्देशीय सभागृह) येथे सकाळी ९.०० वाजता सुरू होणार आहे.
वेताळ प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या या शिबिराची ही सलग ३३ वी वर्षगाठ असून, जिल्ह्यातील वाढत्या रक्तसाठ्याच्या गरजेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सामाजिक कार्य आणि रक्तदान क्षेत्रात सातत्याने योगदान देत असलेली ही परंपरा आजही उत्साहाने पुढे नेली जात आहे.
यावेळी वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी नागरिकांना या मानवसेवेच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
महेश राऊळ – 9405933912

konkansamwad 
