सायबर गुन्हेगार हजारो किलोमीटरवरून फसवतात, सावध रहा......आचरा पोलिसांचे नागरिकांना आवाहन
आचरा / मालवण
सायबर गुन्ह्यांमध्ये आरोपी हा हजार किलोमीटरच्याही पुढून गुन्हा करत असतो, या गुन्ह्याची उकल झाली तरी शंभर टक्के रक्कम परत मिळेल याची खात्री नसते, यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी केले.रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर, आचरा येथे वाचन प्रेरणा दिन आणि वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.उन्हापावसाची पर्वा न करता दररोज पहाटे दुकानावर वृत्तपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी झटणाऱ्या वृत्तपत्र वाहक राजेंद्र यशवंत चव्हाण, कनेडी यांचा सन्मान रामेश्वर सार्वजनिक वाचनालयातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ग्रंथप्रदर्शनाचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सदस्य विरेंद्र पुजारे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या क्षमा कारेकर, ग्रंथपाल विनिता कांबळी, माजी केंद्रप्रमुख सुगंधा गुरव, सांस्कृतिक समितीच्या कामिनी ढेकणे, श्रद्धा महाजनी, गोट्या आचरेकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, सौ. तन्वी जोशी, वाचनालय कर्मचारी महेश बांपर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण, होमगार्ड त्रिंबककर यांसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या क्षमा कारेकर यांनी ग्राहकांसाठी केवायसी अद्ययावत करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, बंद असलेली, वापरात नसलेली, केवायसी अद्ययावत नसलेली तसेच नामनिर्देशन नसलेली खाती यांची यादी बँकेच्या शाखेत आणि संबंधित ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित ग्राहकांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत शाखेशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करावी.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि.प. सदस्या वर्षा सांबारी यांनी केले, तर आभार अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी मानले.
konkansamwad 
