रत्नागिरीत दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम पाय व कॅलिपर वाटप शिबिर
रत्नागिरी
माऊली फाऊंडेशन (काळबादेवी-मुंबई) यांच्या विद्यमाने दिव्यांगांसाठी कृत्रिम पाय व कॅलिपरचे विनामूल्य वाटप करण्यासाठी जयपूर फूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर रविवार दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल, माळनाका, स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाच्या पाठीमागे, रत्नागिरी येथे होणार आहे. या शिबिरासाठी नाव नोंदणी अत्यावश्यक असून नोंदणीची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२६ आहे. नविन दिव्यांगांना प्राधान्य देण्यात येणार आहे.या शिबिराचे समन्वयक डॉ. एच. एस. शिंगण (अध्यक्ष), अॅड. विश्वनाथ टाळकुटे (कार्याध्यक्ष), श्री. प्रशांत बगाडे (सचिव), श्री. संतोष गुजर आणि श्री. रमेश लांबे आहेत.
नोंदणीसाठी संपर्क
जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर ९५२९२३३०६७
श्री. प्रशांत धनवटे ९८९००४३६००
श्री. श्रीकृष्ण पळसे ९३२५८८१४०५
श्री. तात्यासो गायकवाड ८६००३९२४४४
श्रीम. श्वेता कोंडविलकर ९८६७२५६७४९
सौ. पूनम जाधव ९०८२५२३२८५
श्री. महेश लंच होम ८९९९४७१९६३
श्री. हरेश्वर रानडे ९६३७७२७९८८
श्री. धन्वंतरी मेडिकल स्टोअर ९०८२५८५९०५
श्री. राजेंद्र फडतरे ९८४७८३०७९४
श्री. वैभव लांबे ९९३०३६५५६६
सौ. मंगला पाटील ९८९२१४९२८९, ९८२१४००७०९, ९८६९३०३७७१
गरीब आणि गरजू दिव्यांगांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन माऊली फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
konkansamwad 
