सावंतवाडीची 'हर घर तिरंगा यात्रा' १० ऑगस्टला, ५ ते ६ हजारांचा सहभाग अपेक्षित

सावंतवाडीची 'हर घर तिरंगा यात्रा' १० ऑगस्टला, ५ ते ६ हजारांचा सहभाग अपेक्षित

सावंतवाडी

 

        हर घर तिरंगा... घराघरात तिरंगा, मनामनात राष्ट्रभक्ती या भावनेतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यंदाची हर घर तिरंगा यात्रा न भुतो न भविष्यती अशी होणार आहे. या भव्य यात्रेच्या नियोजनासाठी आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक पार पडली. बैठकीला सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. सोमवार दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी सावंतवाडी येथील श्री देव उपरलकर मंदिर येथून सकाळी ठीक १० वाजता या यात्रेला शुभारंभ होणार असून या देशभक्तीच्या सोहळ्यात सुमारे पाच ते सहा हजार नागरिक सहभागी होणार आहेत. घराघरावर तिरंगा फडकवून राष्ट्रप्रेमाचा संदेश देणे हा या अभियानाचा उद्देश असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.