मोठी बातमी! LPG सिलिंडर स्वस्त; पण घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला का?

मोठी बातमी! LPG सिलिंडर स्वस्त; पण घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला का?

  मुंबई


      ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस सर्वसामान्यांसाठी दिलासा घेऊन आला आहे. हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा देत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत कमी झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचा दर कमी झाला असून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत मात्र कायम आहे.ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस सर्वसामान्यांसाठी दिलासा घेऊन आला आहे. हॉटेल्स, रेस्तराँ आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा देत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत कमी झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचा दर कमी झाला असून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत मात्र कायम आहे.तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली असून 200 पेक्षा जास्त रुपयांनी स्वस्त झाला आहे. एलपीजीचे नवीन दर 1 ऑगस्ट 2026 पासून लागू झाले आहेत मात्र, यावेळीही 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी गेल्या महिन्यात, जुलैमध्येही व्यावसायिक सिलिंडरच्या घरात कपात केली गेली होती. पश्चिम आशियात इराण युद्ध आणि व्यापक मध्यपूर्वेतील संकटाशी संबंधित पुरवठ्याच्या चिंतेमुळे जागतिक एलपीजीच्या किमती वाढल्याने गेल्या काही महिन्यांतील मोठी दरवाढ या सुधारणेमुळे अंशतः कमी झाली.