अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कलंबिस्त शाळेत वह्या-खाऊ वाटप.....राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कलंबिस्त शाळेत वह्या-खाऊ वाटप.....राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

सावंतवाडी 


        स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 25 जुलै रोजी कलंबिस्त प्राथमिक शाळा क्र. 1 आणि शाळा क्र. 2 येथे वह्या वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी, जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, तालुकाध्यक्ष उदय भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांच्या संकल्पनेतून दोन्ही शाळा एकत्रित करून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना वह्यांसह खाऊचेही वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला दोन्ही शाळांचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती रिटायर आर्मी ब्लॅक कमांडो प्रकाश सावंत, राजेश पास्ते, अशोक पास्ते उर्फ बाळा पास्ते, श्याम कलंबिस्कर, भाई सावंत हे मान्यवर उपस्थित होते.स्व. अजित पवार यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करण्याचा आणि समाजासाठी चांगले काम करण्याचा संदेश दिला.कार्यक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.