'अवघा रंग एक झाला' - आषाढीला विठ्ठलनामात तल्लीन झाले युवा नेते विशाल परब
वेंगुर्ला
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला असताना, भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब हेही भक्तिरसात रंगून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले."अवघा रंग एक झाला" या संतवचनाप्रमाणे विशाल परब यांनी विठ्ठल नामाचा अखंड जप करत भक्तांसोबत तन-मनाने एकरूप होऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन प्रार्थना केली.आषाढी एकादशीनिमित्त सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीनही तालुक्यांतील विविध विठ्ठल मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रमांना त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. प्रत्येक ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या भक्तांसोबत विठूनामाचा गजर करत त्यांनी पूजा-अर्चा केली. यावेळी संपूर्ण कोकणवासीयांच्या सुख, शांती, समृद्धी आणि निरामय जीवनासाठी त्यांनी मनोभावे प्रार्थना केली.वेंगुर्ला येथील कार्यक्रमात विशाल परब यांच्या उपस्थितीमुळे धार्मिक सोहळ्याला विशेष उत्साह लाभला. विठ्ठल नामाच्या गजरात ते इतके तल्लीन झाले की उपस्थित भाविकांनाही त्यांच्या भक्तीची प्रचिती आली. त्यांच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव आणि वारकरी परंपरेप्रती असलेली आत्मीयता यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.या प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवडळकर, नगरसेवक सचिन शेट्ये, रवी शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष साईप्रसाद नाईक, मच्छीमार नेते दादा केळुसकर, किरण कुबल, विजय रेडकर, विजय बागकर, सुनिल मठकर, राजु गिरप, रसिका मठकर, किशोर रेवणकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने वारकरी व भाविक उपस्थित होते.आषाढीच्या पवित्र दिवशी राजकारणापलीकडे जाऊन अध्यात्म आणि संस्कृतीप्रती असलेली आपली निष्ठा विशाल परब यांनी पुन्हा अधोरेखित केली. विठ्ठलनामात तल्लीन झालेल्या त्यांच्या भक्तिमय रूपाची चर्चा दिवसभर भाविकांमध्ये रंगली.
konkansamwad 
